रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे
ओबडधोबड अन् काटेरी वाटेवरती चालत जाणे
परिणामांची ना करता पर्वा संग्रामी लढत राहाणे,
खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे
संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही
कधी जगाशी कधी स्वत:शी समरकाल हा येतच राही
ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे,

नसे वावगे बाळगणे वेडी स्वप्ने निजहृदयात
संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत
"दुराग्रही हा, दुराग्रही हा" म्हणून स्वत:ला हिणवून घेणे,

या स्वप्नांपुढती प्राणांना येई कवड्यांचे मोल
कारण असती स्वप्नपूर्तीचे दोनच क्षणही अनमोल
स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी स्वप्नांसाठीच जगत राहाणे,
होई तृप्तीच्या दो श्वासांनी सुरेल माझे जीवनगाणे

1 comment:
The Anthem of a lifetime...!
Keep writing dude. Cant wait to see more of the poet in you. Cheers!!
Post a Comment